awareness

सरस्वती हाविद्यालयाच्यावतीने तिगडी गावात वृक्षारोपण

Share

बेळगावच्या सरस्वती पदवीपूर्व महिला महाविद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे तिगडी गावात वृक्षारोपण करण्यात आले.

सालाबादप्रमाणे एका गावाची निवड करून यंदाही तिगडी या गावात पर्यावरण स्वच्छतेबाबत जनजागृती करून विविध प्रकारची 79 रोपे लावून पर्यावरणाबाबत जनजागृती केली.

या कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्षा कल्पना डोंकण्णावर, पीडीओ गोपाल हुबळी, प्राथमिक शाळा एसडीएमसी अध्यक्ष मारुती मदण्णवर, बसवराज बागलकोटी, तिगडी गावचे माजी सैनिक, शाळेचे मुख्याध्यापक व्ही एस हिरेमठ, सहशिक्षक तसेच अण्णाप्पा मराठे, सरस्वती कॉलेजच्या एनएसएस घटक प्रमुख अनुसया हिरेमठ आदी उपस्थित होते.

Tags: