कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी कृष्णा नदीतून तालुक्यातील 22,000 एकर शेताला पाणी देण्यासाठी 14 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐनापूर सिंचन प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

मंगळवारी त्यांनी कृष्णा नदीच्या काठावरील ऐनापूर सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन केले. लाखो शेतकरी शेतात मोसमी पिके घेण्याच्या तयारीत असून यावेळी मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला आहे. मात्र, त्याहीपेक्षा पिकांसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगसुळी , केंपावाड, मदभावीसह सुमारे 40 गावांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही योजना लागू राहणार आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन चांगल्या दर्जाची पिके घ्यावीत, असे आमदार राजू कागे यांनी सांगितले.

ऐनापुर पाटबंधारे प्रकल्पाचे मुख्य अभियंता के. रवी यांनी , गेल्या 14 वर्षांपासून या योजनेतून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे यांनी सांगितले. 1280 अश्वशक्ती पंप संचाद्वारे यापूर्वीच पाणी उपसण्यात आले आहे. यापुढे मंगसुळी सबस्टेशनमधून पुढील गावांना कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रशांत पोतदार , कंत्राटदार रवी कोकटनूर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रवींद्र पुजारी, विनायक बगाडी, मंगसुळी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळू बजंत्री, ऐनापूर नगरपंचायत सदस्य अरुण गाणींगेर , प्रवीण गाणींगेर , संजय बिरडी , अरविंद करची, संजय कुसनाळी, सुरेश पाटील आदी नेते कुमार पाटील संजय तळवलकर संजय आदाटे, निजगुणी मगदूम, अशोक पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments