Belagavi

मंत्रिपदाची आपली इच्छा नाही : दिलेली जबाबदारी पूर्ण करेन : आम. विनय कुलकर्णी

Share

मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही. मात्र पक्षाने मंत्रिपद दिल्यास ते कार्यक्षमतेने हाताळू, असे धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांनी सांगितले.

व्हॉइस : बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी म्हणाले की, पक्षातील विजय किंवा पराभवाची अनेक कारणे असतात. आपल्या मंत्री पदाचा राजीनामा ज्यांनी दिला त्याठिकाणी कुणाची वर्णी लागणार याबाबत बोलताना ते म्हणाले, रिक्त पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. मात्र वरिष्ठांनी आपल्याला संधी दिल्यास आपण ती पार पाडेन, असे ते म्हणाले. ()

रेणुकास्वामी हत्येप्रकरणी अभिनेता दर्शनला करण्यात आलेल्या अटकेबाबत बोलताना ते म्हणाले, अभिनेता दर्शनाची चौकशी सुरु आहे. चूक काम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईलच. दर्शनवरील आरोप न्यायालय ठरवेल, असे ते म्हणाले.

अभिनेता दर्शन प्रकरणी राजकारण्यांचा दबाव असल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, दर्शनचे वर्तन उद्धट आहे हे प्रत्येकाला आता समजले आहे. अशाप्रकारे कोणीही दडपण आणू शकत नाही, असेही विनय कुलकर्णी म्हणाले. ()

पंचमसाली आंदोलनाबाबत आम्ही सर्वांनी स्वामीजींना पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारने खोटी आश्वासने देऊन संघर्षाचा मार्ग वळवला असून, सरकारने सर्व समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद देण्याचे काम करावे, तसेच आम्हाला इतर समाजाप्रमाणे वागणूक द्यावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: