एसबीजी आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत लक्ष्मी नगर हिंडलगा येथील दत्ताजीराव कानूरकर याना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
योगप्रशिक्षक म्हणून ते अनेक ठिकाणी प्रशिक्षण पुरवितात. गेल्या अनेक वर्षांपासून अबालवृद्धांसाठी विविध ठिकाणी योगशिक्षणाचे महत्व पटवून देणारी शिबिरे ते
भरवत आले असून एसबीजी आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


Recent Comments