एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनचालकांवर आज बेळगाव रहदारी विभागाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.
आज सकाळ सकाळीच रहदारी विभागाच्या पोलिसांनी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचा धडाका सुरु केला. डीसीपी स्नेहा, पवन, सीपीआय मंजुनाथ बडिगेर यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ सर्कल, अशोक सर्कल, खानापूर रोड यासह शहरातील प्रमुख चौकात हि कारवाई करण्यात आली. या कारवाईत २०० हुन अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी काही दुचाकीधारकांनी स्टिकर चिटकवले आहेत. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. तसेच सदोष नंबर प्लेट लावलेल्या दुचाकीस्वारांवरदेखील कारवाई करण्यात आली. आरटीओ सर्कलच्या निंबाळकर बिल्डींग नजीक कारवाई करण्यात आलेल्या शेकडो दुचाकी दिसून आल्या. नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (फ्लो)
यासंदर्भात बोलताना डीसीपी स्नेहा म्हणाल्या, कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत, हेल्मेट सक्तीने वापरावे, ज्यांनी अद्याप एचएसआरपी नंबर प्लेट बसविली नाही त्यांनी नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments