दगडखाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धारवाड तालुक्यातील मन्सूर गावच्या शिवारात घडली.
धारवाड शहरातील मलमड्डी येथील श्रेयस हा अन्य एका व्यक्तीसोबत मन्सूर गावाच्या हद्दीत असलेल्या दगडखाणीत पोहण्यासाठी गेला होता. त्यानंतर पोहता न येता दोघेही पाण्यात बुडाले. ग्रामस्थांच्या माहितीवरून अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन श्रेयसचा मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे . . धारवाड विद्यागिरी ठाणे पोलीस आणि ग्रामीण ठाणे पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
Recent Comments