Bagalkot

या वयात हे योग्य नाही! : मंत्री थिम्मापुर यांचा येडियुराप्पांना टोला!

Share

 

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या सीआयडी चौकशीबाबत आज अबकारी मंत्री आर.बी. थिम्मापुर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुधोळ येथे अबकारी मंत्री आर.बी. थिम्मापुर बोलताना म्हणाले, येडियुराप्पानी केलेल्या लैंगिक छळाच्या मुद्द्यावर सीआयडी विभाग त्यांची चौकशी करत आहे, तपासात सत्य बाहेर यायला हवे, असे ते म्हणाले.

या वयात हे सर्व होणे हे योग्य नाही. परंतु या प्रकाराची चौकशी सुरु आहे आणि या चौकशीदरम्यान कोणीही व्यक्ती किंवा सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, असे ते म्हणाले. ()

ते पुढे म्हणाले, मी काही लोकांची विधाने पाहिली आहेत, सिद्धरामय्या आणि डीकेशी यांनी येडियुराप्पांना जाणीवपूर्वक या प्रकरणात ओढले गेल्याची टीका होत आहे. मात्र येडियुरप्पांच्या बाबतीत जे काही सुरु आहे ते न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. यात सूड उगवला नाही, आमच्या सरकारमधील कोणीही राजकीय फायदा घेण्यासाठी, जातीच्या उन्नतीसाठी कुणी काही केले नाही, अशा शब्दात मंत्री थिम्मापुर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Tags: