Chikkodi

चिक्कोडी जिल्ह्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ : खास. प्रियांका जारकीहोळी

Share

बऱ्याच कालावधीपासून पुढे येत असलेल्या स्वतंत्र चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीच्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, तसेच चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिले.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी आज संवाद साधला. यावेळी चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या खासदारांनी समस्या जाणून घेत संवाद साधला.

चिक्कोडी मतदारसंघातील विविध भागातील नागरिकांनी आज आपल्या समस्या सोडविण्यासाठी निवेदने सादर केली. यावेळी चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्याबाबत मुद्दा मांडण्यात आला. याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या,

चिक्कोडी येथील सैनिकांच्या समस्यांना मनापासून प्रतिसाद देईन. तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येसारख्या गंभीर समस्यांसाठी सिंचन योजना राबविण्यास प्राधान्य दिले जाईल. पुराच्या समस्यांकडे लक्ष दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी युवा नेते राहुल जारकीहोळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महावीर मोहिते उपस्थित होते.

Tags: