EVENT

कोळी बेस्त समाज एसटीमध्ये समावेशासाठी आवाज उठवणार : खासदार प्रियांका जारकीहोळी

Share

 

कोळी बेस्त समाजाचा एसटी समाजात समावेश व्हावा यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचे चिक्कोडी लोकसभा सदस्या प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले.
हुक्केरी शहराच्या सीमेवरील एस एस कन्व्हेन्शन हॉलमध्ये कोळीबेस्त समाज जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित महिला संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत हा होत्या .
वडिल, मंत्री सतीश जारकीहोळी यांचीही एसटी समाजात कोळी-बेस्त समाजाचा समावेश करावा, अशी भूमिका आहे. तुमच्या समाजाची प्रगती मला नेहमीच हवी आहे, असेही त्या म्हणाल्या .
लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या ४५ दिवसांच्या प्रचार सभेत महिलांनी मला अनेक विनंत्या केल्या आणि त्यांचे विचार मांडले. महिलांच्या मतानुसार रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात प्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासह ३० वर्षाखालील पाच महिलांनी संसदेत प्रवेश केला होता, असे त्या म्हणाल्या .
आज महिला स्वतःच्या बळावर समाजात प्रगती करत आहेत. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वडील, आई आणि कुटुंबातील सदस्यांसह सर्वांनी काम केले पाहिजे.


बेळगाव जिल्हा कोळी बेस्त समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीपकुमार कुरंदवाडे यांनी सांगितले की, आपल्या समाजातील महिला संघटन आणि महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आज या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी हे मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी गेली वीस वर्षे कार्यरत आहेत. ते आपल्या समाजाचा कणा म्हणून उभे असल्याचेही कुरुंदवाडे म्हणाले .
माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू सुनगार म्हणाले की, प्रियांका जारकीहोळी यांनी लहान वयात चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून राज्यात इतिहास रचला आहे. आपल्या समाजाने त्यांचा सन्मान केला याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
त्याचबरोबर कोळी बेस्त समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी संसदेत आवाज उठवावा, अशी मागणी समाज बांधवांनी केली.

यावेळी जि.पी.आय.चे माजी सदस्य सिद्धू सुनगार , महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी बेस्त समाजाचे उपाध्यक्ष डॉ.
भगवान कोळी, बसवराज सुनगार , ऍड संजय पाटील, महादेव बोनी, शिवनिंग नायक,
संगीता कोळी यांच्यासह शेकडो समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: