चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरात एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला.
व्हॉइस ओव्हर : एकसंबा शहरातील महेश कुरणी (४८) याचा काल रात्री उशिरा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला.
एकसंबा शहरातील बिरेश्वर कॉलनीत ही घटना घडली. पहाटे मृतदेह आढळून आल्याने स्थानिकांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. ही बाब समजताच सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मारेकऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सदलगा पोलिस ठाण्यात ही घटना घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Recent Comments