Athani

रमेश जारकीहोळींकडून आम. सवदींवर आरोप! जारकीहोळी कुटुंबाकडून आम. सवदी टार्गेट?

Share

काही लोकांना वाटते की ते जे खेळत आहेत तो खेळ आहे. डोंगरगावचा पराभव करण्यासाठी आमदार लक्ष्मण सवदी यांनी रातोरात पक्षात प्रवेश केला, असे विधान करत रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावर टीका केली. यामुळे आमदार सवदी यांना जारकीहोळी कुटुंब टार्गेट करत आहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

अथणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले, महेश कुमठळ्ळी यांनी अथणी मतदारसंघात चांगले काम केले आहे. मात्र 2023 च्या निवडणुकीत भाजपमधून काँग्रेस मध्ये उडी मारलेल्या सवदींचा विजय झाला. चवीसाठी म्हणून अशा उद्या घेणाऱ्यांसंदर्भात अथणीतील जनता भविष्यात योग्य निर्णय घेईल, असा टोला जारकीहोळींनी लगावला.

भाजपने याआधी सवदी यांना पक्षात परतण्याचे निमंत्रण दिले होते होते का? या प्रश्नावर उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले, भाजपने सवदींना कोणत्याही कार्यक्रमासाठी आमंत्रित केले नाही आणि कोणत्याही कारणास्तव पुन्हा आमंत्रित करणार नाही. भाजप पक्षात असे हजारो कार्यकर्ते आहेत. भाजप पक्षासाठी सवदी आवश्यक नाहीत. दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये अशा पद्धतीने उड्या मारणाऱ्यांना शहाणपण यायला हवे, असे जारकीहोळी म्हणाले.

यावेळी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केलेल्या दरवाढीबद्दल संताप व्यक्त करत ते म्हणाले, की काँग्रेस सरकारने द्वेषातून हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला पाठिंबा दिल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून भाजपविरोधात रोष व्यक्त केला जात असल्याची टीका त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत राज्य सरकारने हमीभाव योजनेचे आमिष दाखवूनही भाजपने जास्त जागा जिंकल्या आहेत. आता हे सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून राज्यातील जनतेवर बोजा टाकत आहे. एक हाताने देऊन दुसऱ्या हाताने वसूल करून घेत आहेत. यात काही नवीन नाही, काँग्रेस सरकार पूर्वीपासून सातत्याने हे करत आले आहे. पण लोकांना आता या सरकारचे धोरण समजू लागले आहे, असे ते म्हणाले.

कर वाढवणे आणि सर्वसामान्यांवर बोजा टाकणे हे योग्य पाऊल नाही. मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आम्ही सत्तेत असताना इंधनाच्या किमती वाढवल्या, तेव्हा याच काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र आता त्यांचेच सरकार असून त्यांनीच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले ​​आहेत.

Tags: