festival

हुबळीत बकरी ईद उत्साहात साजरी

Share

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या बकरी ईद निमित्त हुबळी येथील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली.

हुबळी येथील ईदगाह मैदानावर, बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सामूहिक नमाज पठण केले. यावेळी आबालवृद्धांनी एकत्रित येऊन सामूहिक नमाज पठण अदा केल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

 

बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

Tags: