कित्तूर तालुक्यातील एम. के . हुबळी गावात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी गावात आज ईद-उल- अधा उत्साहात साजरी करण्यात आली. ‘ईद-उल-अधा ‘ हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्यात साजरा केला जातो. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. बकरी ईद , ईद-उल-फित्रच्या दोन महिन्यांनंतर साजरी केली जाते. आज एम.के. हुबळी येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक नमाज अदा करण्यात आली आणि एकमेकांना शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. शेजारी आणि नातेवाईकांनीही घरी सण साजरा केला.



Recent Comments