hubbali

हुबळीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या मद्यपीला नागरिकांनी चोप

Share

हुबळीत रस्त्यावर रोडरोमियोंचा त्रास वाढला आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत महिलांची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला नागरिकांनी पकडून मारहाण केल्याची घटना हुबळी जनता बाजाराजवळ घडली.
हुबळी येथे दारूच्या नशेत महिलेशी असभ्य वर्तन केल्याने एका तरुणाला चप्पलने मारहाण करण्यात आली.

तसेच बाजारातील मद्यधुंद पुरुषांच्या त्रासामुळे मुलींना असुरक्षित वाटत आहे आणि अगदी सभ्य मुलींची ही रस्त्यावरच्या पुरुषांकडून छेडछाड होणे हे अगदी सामान्य बनले आहे. उपनगर पोलिसांना यावर अंकुश ठेवावा लागणार आहे.

Tags: