Belagavi

वार्ड क्रमांक २९ मध्ये अस्वच्छता :पाळत ठेवून ठोठावला दंड

Share

कचरा गाडीकडे कचरा न देता तो रात्रीच्या वेळी बेजबाबदारीने रस्त्यावर फेकणाऱ्यांवर पाळत ठेवून , त्यांना दंड ठोठावून कडक इशारा देण्यात आला आहे .नगरसेवक नितिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली .

जागोजागी कचऱ्याचे साठलेले ढीग हे आपल्याकडील शहरांत नित्याचेच झाले आहे . ‘स्वच्छ भारत’च्या घोषणांनी कितीही कंठशोष होत असला आणि त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून स्पर्धा घेऊन शहरांची क्रमवारी लावली जात असली, तरी अस्वच्छता काही संपलेली नाही. वॉर्ड क्र.29 येथे शुक्रवार पेठ भागात आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने अंडरग्राऊंड डस्टबिन बसविण्यात आली आहे. महानगर पालिका वतिने कचरा गाडया रोज येतात तरीही काही बेजवाबदार नागरिक कचरा डस्टबिन च्या बाहेर टाकत होते. त्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. महानगर पालिकेने याची दखल घेवून नगर सेवक नितिन .ना जाधव यांच्या नेतृत्वात रात्रीच त्या ठिकाणी पाळत ठेवून ज्यांनी ज्यांनी तेथे कचरा बेजबाबदारीने टाकत होते त्यांचा फोटो कडून त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.आणि नितिन जाधव यांनी कडक इशारा दिली आहे की त्यांना दंड देवून त्यांचा परवानगी रद्द करण्यात येईल.
या वेळी मनपाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते..

Tags: