चिक्कोडी तालुक्यातील भोज मार्गा भागातील बेडकिहाळ गावात एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे उघडकीस आली.

जिनाप्पा नागू भांडवडे (वय 37) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिनप्पाची आई दुसऱ्या गावी होती आणि तो घरात एकटाच राहत होता. मृत व्यक्ती मद्यपी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सदलगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments