बेळगावात बालविक्रीचे नेटवर्कमध्ये अटक केलेल्या कित्तूर येथील डॉ . अब्दुलगफार लाडखान याच्यावर बेकायदा गर्भपात केल्याच्या आरोप आहे . याप्रकरणी त्याच्या कित्तूर येथील फार्महाऊसवर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता तीन भ्रूणांचे अवशेष सापडले.
बालविक्रीचे नेटवर्क सापडल्याप्रकरणी आरोपी डॉ . अब्दुलगफार लाडखान याच्यावर बेकायदा गर्भपात केल्याचा आरोप होता, बेळगाव पोलिसांनी बालविक्री प्रकरणी आरोपी लाडखान याला अटक केली. बनावट डॉक्टर लादखान गर्भपात करत असल्याचा स्थानिकांकडून आरोप झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाची परवानगी घेऊन , पोलीस विभाग ,तसेच महसूल विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष फार्महाऊसची पाहणी करून झडती घेण्यात आली .
गेल्या दहा वर्षांपासून चालवले जाणारे डॉ . लाडखान याचे रुग्णालय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश कोनी, एसी प्रभावती फकीरपूर, डीएसपी रवी नायक यांनी शोध मोहिमेचे नेतृत्व केले आणि डॉक्टरांचा सहाय्यक रोहित कुप्पसगौडा याला ताब्यात घेतले आहे. भ्रूण दफन करण्यात आल्याची माहितीही पुढे आली असून शोध घेत असताना तीन भ्रूणांचे अवशेष सापडले आहेत. तीन भ्रूण फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. बनावट डॉक्टरांच्या हॉस्पिटलवर छापा टाकून त्याच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येत आहे . बनावट डॉक्टरांवर कारवाई न केल्याने तालुका आरोग्य अधिकारी एस एस सिद्धण्णावर याना नोटीस बजावण्यात येईल, असे सांगण्यात आले .
Recent Comments