actors

रेणुकास्वामी हत्या प्रकरण :जंगम समाज आणि कन्नड संघटनांचा निषेध

Share

 

जंगम समाजातील तरुण रेणुकास्वामी याच्या हत्येचा आरोप असलेला पवित्रा गौडा , अभिनेता दर्शन आणि हत्येतील अन्य आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बेळगावात जंगम संघटना आणि विविध कन्नड संघटनांतर्फे निदर्शने करण्यात आली.

जंगम संघटना आणि विविध कन्नड संघटनांनी बेळगावी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करून अभिनेते दर्शनच्या चित्राला चप्पलांनी मारहाण करण्यात आली .

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हुबळीच्या नेहा हिरेमठ, अंजली अंबिगेर आणि आता चित्रदुर्गातील रेणुकास्वामी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रेणुकास्वामी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या पवित्रा गौडा आणि अभिनेता दर्शनसह इतर सर्व आरोपींवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलक महंतेश रनगट्टीमठ म्हणले कि , पवित्रा गौडा आणि अभिनेता दर्शन यांनी रेणुकास्वामी यांची निर्घृण हत्या केली आहे . राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कर्नाटकात राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे. रेणुकास्वामी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासोबतच रेणुकास्वामी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
या कार्यक्रमात वाजीद हिरेकुडी, संगीता कांबळे, महेश हिरेमठ, एरण्णा हिरेमठ, जगदीश मठद आदींचा सहभाग होता.

Tags: