award

ठळकवाडी हायस्कूलचे शिक्षक संजीव एस् कोष्ठी यांना रामतीर्थकर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

Share

बेळगाव येथील एस्. के. ई सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडीचे कन्नड विषय शिक्षक, संजीव एस् कोष्टी यांना विनायकराव शिरगांवकर प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा मानाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ल गेल्या 2013 व्या वर्षांपासून श्रीहरी विद्यालय उगार खुर्दचे माजी विद्यार्थी संघटना आणि श्री विनायकराव शिरगांवकर प्रतिष्ठान यांच्यावतीने थोर विज्ञान शिक्षक मुख्याध्यापक कै. रामतीर्थकर यांच्या स्मरणार्थ बेळगाव, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील कर्तुत्ववान शिक्षकांसाठी हा मानाचा पुरस्कार दिला जात असून, या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे असून सन् 2024 चा हा आठवा पुरस्कार संजीव एस् कोष्टी यांना मिळाला आहे.

शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी हा पुरस्कार प्रदान समारंभ श्रीहरी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी प्रमुख वक्त्या म्हणून निवृत्त प्राचार्या अरूणा नाईक उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रफुल्ल शिरगांवकर, सी. एस् शिरगांवकर, हरिभाऊ आठवले, डाॅ.प्रमोद हणमगोंड व डाॅ.जे जी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: