डॉ. सुनील परीट लिखित आणि संपादित या दोन कलाकृतींचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
रविवारी सायंकाळी बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. सुनील परीट लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मंगला मेटगुड्ड, डॉ. निर्मला भट्टल, डॉ. ए.बी. इटगी, प्रा. एस.एम गंगाधरैया, डॉ.शिवू नंदगावे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकरणी डॉ. निर्मला भट्टल, यांनी डॉ. सुनिल परीट यांच्या लिखित आणि संपादित केलेल्या दोन कलाकृतींची माहिती दिली. पर्यावरण दिनाविषयी बोलताना त्या म्हणाल्या कि , तुम्ही एखादे बी किंवा रोप लावले तर संपूर्ण मानवजातीला उपयुक्त ठरेल . . बाप हा मुलांचा हिरो असतो आणि माझे वडील हेच माझे जीवन असल्याचे सांगत त्यांनी फादर्स डेचे महत्त्व सांगितले.
याप्रसंगी साहित्यिक एस.आर सुळकुडे, मोहन पाटील, यु.एन. संगणालमठ आदींउपस्थित होते .


Recent Comments