Belagavi

बेळगाव ग्रामीण भागातील शेकडो मंदिरांचा विकास : मंत्री हेब्बाळकर

Share

अँकर ल महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत शंभरहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास करण्यात आला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अरळीकट्टी गावात बांधण्यात येत असलेल्या श्री बसवेश्वर मंदिराच्या छतासाठी काँक्रीट (स्लॅब) टाकण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री महोदयांनी केला. मतदारसंघात यापूर्वीच अनेक मंदिरे विकसित झाली असून सर्व जातींच्या धार्मिक केंद्रांच्या जीर्णोद्धारासाठी पावले उचलण्यात आली आहेत. मंदिरांच्या विकासासोबतच गावांचाही सर्वांगीण विकास केला जात असल्याचे मंत्री म्हणाल्या .

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सी.सी.पाटील, सुरेश इटगी, बी.एन.पाटील, आण्णाप्पा पाटील, गुरप्पा हेब्बाळकर, बसवराज सत्तीगेरी, रुद्रप्पा उप्पार, रमेश तीगडी, राजू उप्पार, गौडप्पा पाटील, नागराज करलिंगण्णावर, गिद्देण्णा सिंघडी, चंबण्णा उलेगड्डी , अनिल कारलिंगन्नवर, , इरन्ना मूलीमनी , गंगय्या हलकरनीमठ , शंकर हरिजन , इरय्या पुजारी , इरय्या मठपती , रुद्रप्पा कट्टीकर , गावातील महिला उपस्थित होत्या.

Tags: