ट्रॅक्टरच्या साह्याने शेत नांगरत असताना वीजभारीत तारेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील कुसनाळ गावात घडली.

राजन हरिश्चंद्र नायक (वय ३१) असे मृताचे नाव आहे. त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे वडील हरिश्चंद्र नायक यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजन आणि हरिश्चंद्र नायक हे ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत असताना शेतात जाणाऱ्या विजेच्या तारेचा जबर धक्का लागल्याने राजन यांना धक्का बसला. यावेळी हरिश्चंद्र नाईक मदतीला गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला . दोघांना इचलकरंजी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार निष्फळ ठरल्याने राजन याचा मृत्यू झाला.
Recent Comments