Belagavi

जमिनीच्या वादातून भावाचा खून; पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा

Share

लहानपणापासून एकत्रित वाढलेला भावांमध्ये जमिनीवरून सुरु असलेल्या वादाने खुनापर्यंत मजल मारली असून हारुगेरी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी डॉ. भीमा शंकर गुळेद यांनी दिली.1

बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. ४ जून रोजी हारुगेरी सुलतान पूर या गावातील इराप्पा चौगुला नामक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर बागलकोट जिल्ह्यात मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची गती वाढवून या प्रकरणाचा छडा लावला. मृत इराप्पा चौगुला याचा खून श्रीशैल चौगुला नामक त्याच्याच भावाने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी श्रीशैल चौगुला यांच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील बिळगी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत इराप्पा चौगुला याचा मृतदेह फेकून पळून जाण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. जमिनीच्या मुद्द्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद सुरु होते. एक एकर जागेची विक्री केल्याप्रकरणी इराप्पा आणि श्रीशैल या दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक चकमक उडाली होती. जमिनीची विक्री केली जाऊ नये या मतावर श्रीशैल ठाम होता मात्र मृत इराप्पाने हि जमीन विक्री केल्याने संतापाच्या भरात आपल्या ८ साथीदारांच्या मदतीने इराप्पाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Tags: