स्वीमर्स क्लब बेळगाव आणि ऍक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी २६ सुवर्ण, २० रौप्य, २१ कंन्स पदके पटकावीत ६७ उपविजेत्या पदांसह घवघवीत यश संपादन केले आहे.

गोवा येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत या संस्थेच्या जलतरणपटूंनी हे यश मिळविले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूनि तब्बल ६७ पदके पटकावीत बेळगावचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत आरोही चित्रागारला ६ सुवर्ण, मोहित काकतकरला ६ सुवर्ण, हर्षवर्धन कार्लेकरला २ सुवर्ण पदके मिळाली आहेत. आमदार अभय पाटील, नगरसेवक नितीन जाधव यांनी या जलतरणपटूंचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments