Belagavi

NEET परीक्षा घोटाळाप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी : एआयडीएसओच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन

Share

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराचा निषेध करण्यासाठी एआयडीएसओच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि तरुणांनी बेळगावात निदर्शने केली.

NEET परीक्षा घोटाळ्याची चौकशी करावी, या मागणीसाठी एआयडीएसओच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. (फ्लो)

यावेळी बोलताना एआयडीएसओचे राज्य समन्वयक महांतेश बैलादूर म्हणाले, “NEET 2024 च्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी सर्वाधिक 720 गुण मिळवले आहेत आणि ते प्रथम क्रमांकावर आले आहेत. NEET परीक्षेच्या इतिहासात या वेळी अभूतपूर्व संख्येने विद्यार्थ्यांनी 720 गुण मिळवले आहेत आणि यापैकी अनेक विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावर बसले असल्याचा संशय आहे. यामागे बेकायदेशीर गोष्टी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG पुनर्परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. नोटीसनुसार, NEET निकालात ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांसाठी पुन्हा 23 जून रोजी परीक्षा होणार आहे.याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

काही विद्यार्थ्यांना पेपर वेळेवरती न दिल्यामुळे गुण वाढवून दिले. या प्रकारचे स्वतंत्र स्पष्टीकरण न दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला असून सदर परीक्षेच्या अनुषंगाने मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार ५ ते ६ परीक्षा केंद्रावरती पेपर फुटीचा प्रकार आढल्याचे निष्पन्न झाल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

Tags: