बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीतर्फे उत्कृष्ट स्केटिंगपटूंचा सन्मान करण्यात आला.

बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने स्केटर्सना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केले. गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात एकेस्पोर्ट्सचे सीईओ अक्षय कुलकर्णी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सौरभ साळोखे, जान्हवी तेंडुलकर, सई पाटील, आराध्या पी, आर्या कदम, श्री रोकडे, अनघा जोशी, भव्य पाटील, प्रांजल पाटील, कुलदीप बिर्जे, सार्थक चव्हाण, करुणा वाघेला सत्यम पाटील, खुशी आगमणी, दुर्वा पाटील आदी पदक विजेत्या स्केटिंगपटूंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी सुर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सक्षम जाधव, सागर चोगुले आदी उपस्थित होते.


Recent Comments