karnatak

बसवराज बोम्मई यांचा आमदारकीचा राजीनामा

Share

हावेरी गदग लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
खासदार म्हणून निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिगावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष यू टी खादर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन राजीनामा पत्र सादर केले.

यावेळी विरोधी पक्षनेते आर.अशोक, आमदार मुनिराजू, जीटी देवेगौडा, भोजे गौडा यांनी बोम्मई यांना पाठिंबा दिला. राजीनामा स्वीकारल्यानंतर सभापती खादर यांनी बोम्मईना शुभेच्छा दिल्या

Tags: