karnatak

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस सरकारचा मोठा धक्का : कर्नाटकात पेट्रोल, डिझेल किरकोळ विक्री करात वाढ

Share

 

कर्नाटक सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील किरकोळ विक्री कर वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. करवाढीमुळे राज्यात पेट्रोलचा दर 3 रुपये तर डिझेलच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ होणार आहे. यासोबतच राज्यात प्रदीर्घ काळानंतर पेट्रोल, डिझेल महाग होत आहे .यापूर्वी पेट्रोलवर 25.92% किरकोळ विक्री कर होता. आता त्यात 3.9% ने वाढ होऊन 29.84% झाला आहे. डिझेलवर किरकोळ विक्री कर पूर्वी १४.३४ टक्के होता. आता 4.1% ची वाढ झाली आहे आणि ती 18.44% पर्यंत वाढली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोलचे दर 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ होणार आहे.

बंगळुरूमध्ये सध्या एक लिटर पेट्रोलचा दर 99.84 रुपये आहे. डिझेलचा दर 85.93 रुपये प्रति लिटर आहे. आहे आता करवाढीनंतर पेट्रोलचा दर 102.84 रुपये प्रतिलिटर झाला आहे. डिझेलचा दर 89.43 रुपये प्रति लिटर आहे. विविध जिल्हे आणि ग्रामीण भागात सरकारने शनिवारी (15 जून) दुपारी जारी केलेल्या परिपत्रकात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ तत्काळ लागू होईल, असे नमूद केले आहे.

 

सरकारने शनिवारी (15 जून) दुपारी जारी केलेल्या परिपत्रकात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ तत्काळ लागू होईल, असे नमूद केले आहे.

 

लोकसभा आणि विधान परिषद निवडणुका संपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व विभागांशी सल्लामसलत केली. उत्पन्न वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. सरकारने यापूर्वीच दारू विक्रीवरील कर वाढवला आहे. वाहन आणि रोड टॅक्स वाढवण्याचा पर्याय सरकारपुढे नाही. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीवर कर वाढवून तिजोरी भरणार आहे.
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दारात वाढ केल्याने , बेळगावमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

Tags: