खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील ग्रामस्थांनी कसबा नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी भीमाशंकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

ग्रामपंचायत अध्यक्ष आणि ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे विविध मागण्यांसाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनात सरकारी शाळा आणि ग्रामपंचायत व्याप्तीतील जागांसंदर्भात काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून १ जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात आहे. शेजारीच असलेली शाळेची पहिली इमारत धोकादायक बनली असून अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात खेळणाऱ्या शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यासाठी हि बाब धोकादायक असून ग्रामपंचायतीने ही इमारत जमीनदोस्त करावी व त्याचे पुननिर्माण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचप्रमाणे गावातील सार्वजनिक ठिकाणी ज्या मोकळ्या जागा आहेत त्या सर्व जागांचे ग्रामपंचायती कडून सर्वेक्षण करण्यात यावे, व मोजमाप करून त्याची नोंद उताऱ्यावर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकवर्ग व गावकऱ्यांच्या सहीनिशी विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, भरमाजी पाटील, सुधाकर पाटील, शंकर पाटील, दत्ताराम पाटील, लक्ष्मण पाटील, उदय पाटील, ईश्वर पाटील, प्रेमानंद पाटील आदींच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.


Recent Comments