Belagavi

बेळगाव न्यायालय परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; कैदी जयेश पुजारी याची सखोल चौकशी

Share

तुरुंगात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकावलेल्या आणि न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान झिंदाबादचा नारा देणाऱ्या आरोपी जयेश पुजारी याची पोलिसांनी चौकशी केली आहे.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या जयेश पुजारी या आरोपीने न्यायालयात खटल्यादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्या. या प्रकारानंतर त्याची पोलीस चौकशी सुरु झाली असून चौकशी दरम्यान आपल्याला या घोषणा देण्यास सांगण्यात आले होते, असा खुलासा त्याने केला आहे. जयेश पुजारी हा गेल्या ५ ते ६ वर्षांपासून अशाच गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे. पोलीस चौकशीदरम्यान तो कोणत्याही गोष्टीला योग्य प्रतिसाद देत नसल्याची माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांच्या एकाही प्रश्नाला तो नीट उत्तर देत नसल्याचे समजते आहे.

Tags: