Dharwad

अंगणवाडीला येणाऱ्या धान्याची रातोरात विक्री!

Share

धारवाडमध्ये एका अंगणवाडी शिक्षिकेने अंगणवाडीतील मुले आणि गर्भवती महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची पोती रातोरात विकली असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

धारवाड तालुक्यातील मरडगी गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या नंदगड अंगणवाडीतील गौरम्मा नावाच्या शिक्षिकेने रात्री अंगणवाडीत येऊन धान्याची पोती आणि इतर साहित्य दुचाकीवरून अन्यत्र घेऊन जात असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

याप्रकरणी एका गावकऱ्याने दुचाकीस्वाराला रंगेहात पकडले. दरम्यान हे धान्य हेबळी अंगणवाडी केंद्रात घेऊन जात असल्याचे सांगत दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला. लहान मुले व गर्भवती महिलांचे धान्य इतरत्र विकले जात असून महिला व बालकल्याण विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मरडगी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: