Banglore

अभिनेता दर्शनला कोणतीही विशेष सवलत नाही : मंत्री एच. के .पाटील

Share

कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेता दर्शन याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कायदेशीर पद्धतीनेच कारवाई सुरु असून कोणतीही विशेष सवलत देण्यात येत नसल्याची माहिती मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.

बेंगळुरू येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलीस ठाण्यात शामियाना उभारण्यात आल्यावरून पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना ते म्हणाले, पोलीस ठाण्यात कोणत्याही गोपनीय गोष्टींसाठी शामियाना उभारण्यात आला नसून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी शामियाना उभारण्यात आला आहे. दर्शनच्या अटकेप्रकरणी त्याला कोणतीही विशेष सवलत अथवा वागणूक दिली जात नसून कायद्याच्या चौकटीतच त्याच्याशी व्यवहार करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यातील परिस्थिती आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याठिकाणी १४४ कलम सहजपणे लागू करता येतो. अतिरिक्त पोलिसांच्या सोयीसाठी पोलीस स्थानकात काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून व्हीआयपींसाठी काहीच करण्यात आले नसल्याचे एच. के. पाटील यांनी स्पष्ट केले.

Tags: