Belagavi

बेळगावचे चार युवक बेळगाव ते लेह लडाख दुचाकी वरून रवाना

Share

बेळगाव शहरातील चार युवकांनी दुचाकीवरून तब्बल ६६१५ किलोमीटरचा प्रवास करण्याचा निश्चय केला असून बेळगाव- दिल्ली ,दिल्ली-लेह-लडाख व पुन्हा बेळगाव असा प्रवास करण्यासाठी बेळगावचे चारही युवक आज रवाना झाले. युवक सुशांत संजय सांगूकर (गोंधळी गल्ली), मृणाल मधुकर काकतकर (हिंडलगा), कौशिक शिवाजी भातकांडे व प्रियेश किरण लोहार (दोघेहि राहणार भातकांडे गल्ली) या चारही युवकांनी बेळगाव ते लेह लडाख प्रवासासाठी दुचाकीवरून बुधवारी प्रयाण केले.

चार युवकांची ही तुकडी बेळगाव ते दिल्ली ,दिल्ली ते लेह लडाख व पुन्हा बेळगाव असा जवळजवळ 6615 किलो मीटरचा प्रवास दुचाकी वरून करणार आहे. बेळगाव ते दिल्ली या 1800 किलो मीटरच्या प्रवासा नंतर दिल्ली ते मनाली (520 कि.मी.), मनाली ते बरालाच्या पास (145 कि.मी.), बरालाच्या पास व्हाया गट्टा लूप्स ते सर्चु (80 कि. मी.), सर्चुलुप्स ते पँगगॉन्ग लेक(330 कि.मी.),पँगगॉन्ग लेक ते लेह (150कि.मी.), लेह ते खारदुंगला पास (70 कि.मी.), खारदुंगला पास ते नुब्रा व्हॅली (90कि.मी.), नुब्रा व्हॅली परत लेह (160कि.मी.)

लेह ते मॅग्नेटिक हिल (28 कि.मी.), मॅग्नेटिक हिल ते कारगिल (190 कि.मी.), कारगिल ते भाया सोनमर्ग जोजीला पास (120कि.मी.), जोजीला पास ते श्रीनगर (100 कि.मी.), श्रीनगर ते कचरा वैष्णोव देवी (240 कि.मी.), वैष्णव देवी ते जम्मू (60 कि.मी.), जम्मू ते हरिद्वार (540 कि.मी.), हरिद्वार ते दिल्ली (210 कि.मी.), दिल्ली ते बेळगाव (1800कि.मी) असा प्रवास ते करणार आहेत. आज बेळगावमधून चारही युवक प्रवासासाठी रवाना झाले असून मित्रमंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: