ARREST

चिक्कोडी बसस्थानकात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

Share

एकसंबा शहरातील रुपाली श्रीशैल आवटी यांच्या व्हॅनिटी बॅगमधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चिक्कोडी शहर बसस्थानकात अटक केली आहे.

केएसआरटीसी बस स्थानकावर बेळगावला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना आरोपींनी व्हॅनिटी बॅगची चेन काढून बॅगेतील ६९ ग्राम सोन्याचे दागिने लंपास करून पळ काढला होता. याप्रकरणी कोल्हापूर मधील रीना दाबाडे, नीलम चव्हाण, हेमा कुसबेकर आणि बसस्थानकावर खाऊची पाकिटे विकणाऱ्या करोशी गावातील रहिवासी संतोष बाबुराव कोरवी या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून ३७९३०० रुपये जप्त केले आहेत.

डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा, सीपीआय एन.सी. काडदेवर, पीएसआय सचिनकुमार दासरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय सुनंदा तमगोंड, जी.एस. कांबळे, एस.पी. गलगली, एन.एस. बडिगेर, एम.पी. सत्तीगेरी, आर.जी. कोळोळ्ळी, बी. ए. लक्कण्णावर, आर. आर. करीगार, एस. बी. चौगुला, रूपा जाधव, लक्ष्मी खोत, शोभा कांबळे, श्रीदेवी गोंदी, विनोद ठक्कण्णावर आदींनी हि कारवाई पूर्ण केली.

Tags: