निपाणी तालुक्यातील डोणेवाडी गावातील सरकारी शाळेच्या खोल्यांचे उद्घाटन आमदार शशिकला जोल्ले यांच्याहस्ते पार पडले. यावेळी सरकारी शाळा वाचविण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी आमदारांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
माजी मंत्री तथा निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते 28 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सरकारी वरिष्ठ कन्नड प्राथमिक शाळेच्या दोन नवीन खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, सरकारी शाळा वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शालेय विकासाचे काम केले जात असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास बीईओ महादेवी नाईक, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, भाजपचे कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
Recent Comments