खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीच्या परिसरात दिवसाही विद्युत दिवे सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.

नंदगड गावचे क्षेत्रफळ मोठे आहे . या भागात रायपूरगल्ली, निंगापुरगल्ली, हलसी-खानापुरा मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते आहेत. या भागात काही ठिकाणी रात्रीच्या वेळी खांबांना वीज जोडणी नीट नसते, तर काही ठिकाणी दिवसाही दिवे जळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकाराबाबत जनतेतून संताप व्यक्त होत असून नंदगड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव व उपाध्यक्षा संगीता मड्डीमणी अद्याप काय करत आहेत? असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत. (फ्लो)
या गावातील अनेक नागरिक रात्रपाळीचा बाहेरगावी जातात. आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते मात्र अशावेळी काही ठिकाणी वीजजोडणीच नसल्याने विद्युत खांब देखील नाहीत, तर काही ठिकाणी दिवसाढवळ्याही वीजखांबावरील लाईट सुरूच असल्याने या प्रकाराबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.


Recent Comments