Banglore

अभिनेता दर्शन प्रकरणी सरकार हस्तक्षेप करणार नाही : गृहमंत्री

Share

अभिनेता दर्शनने रेणुका स्वामी खून प्रकरणात बचावासाठी एका प्रभावशाली राजकारण्याला फोन केला होता याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केली आहे.

व्हॉइस :बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, रेणुकास्वामी खून प्रकरणी सरकार हस्तक्षेप करणार नाही, पोलिसांना कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याची मुभा गृहमंत्र्यांनी दिली आहे. अभिनेता दर्शनचा खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरु असून तपासात जे समोर येईल त्यावर कारवाई करू. कायदा सर्वांसाठी समान आहे, असे ते म्हणाले.

कोणीही कायदा हातात घेऊ नये. रेणुकास्वामी यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टबाबत तक्रार करता आली असती. पोलीस तपास झाला असता. पण याप्रकरणी आता एकाचा जीव गेला असून याप्रकरणाचा अधिक तपास करून कायद्यानुसार पोलीस विभाग कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वेळी ते म्हणाले की, हत्या झालेल्या रेणुकास्वामी यांच्या कुटुंबीयांसाठी सरकार काय करू शकते याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.  या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीबद्दल बोलताना ते म्हणाले, सर्व तपास सीबीआयकडे देणे आवश्यक आहे. याप्रकरणी 13 जणांना अटक केली आहे. हे कोणी केले? का केले याबाबत तपास सुरु आहे. त्यामुळे तपासासाठी अन्य यंत्रणांना हि जबादारी देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरणाचा तपशील समजेल. अभिनेता दर्शनचा अनेक प्रकरणात सहभाग असून याचाही तपास घेण्यास पोलीस सक्षम आहेत. त्यांना तपासाची मोकळीक दिली असून तपासानंतर पोलीस कोणत्या निष्कर्षाप्रती पोहोचतात हे आपण पाहूया अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, याप्रकरणाचाही तपास सुरु आहे. सर्व गोष्टींचे पुरावे जमा करून पोलीस विभाग आवश्यक ती कारवाई करत असल्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले.

Tags: