latest

रायबाग तहसीलदार कार्यालयातील असभ्य सरकारी अधिकाऱ्यावर ताशेरे

Share

जनतेसाठी शासनाकडून अनेक नियम आणि सूचना पाळण्याची सक्ती करण्यात येते. मात्र याच सूचनांना, आदेशांना आणि नियमांना हरताळ फासण्याचे काम अधिकाधिक शासकीय कार्यालयातूनच होते, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. याचाच प्रत्यय आज रायबाग तहसीलदार कार्यालयात आला आहे.

रायबाग तहसीलदार कार्यालयातील अरुण अडनुरे नामक सरकारी अधिकारी कर्तव्य बजावत असताना, कार्यालयाच्या आवारात, सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचे सेवन करताना आढळून आले आहेत. यासंदर्भातील दृश्य कार्यालयात कामानिमित्ताने गेलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले असून महिला, मुलींचा वावर असणाऱ्या परिसरात अशापद्धतीने बेशिस्तपणे वागणे एका सरकारी अधिकाऱ्याला कितपत योग्य वाटते असा सवाल नागरीकातून उपस्थित करण्यात येत आहे. सरकारी अधिकारीच जर असे बेशिस्तपणे वागले तर नागरिकांनी कुणाचा आदर्श घ्यावा? असा संतप्त सवालदेखील नागरिक करत आहेत. आदेशाची अंमलबजावणी करताना शिस्तीची, कायदेशीर चौकट पाळली पाहिजे हे सरकारी अधिकाऱ्यांना माहीत असणे गरजेचे असून रायबाग तहसीलदारांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे शिकवावेत, असा सल्लाही नागरिक देत आहेत.

Tags: