ARREST

लाखोंच्या किमतीचे चोरीचे पंपसेट जप्त : कुडची पोलिसांची कारवाई

Share

रायबाग तालुक्यातील कुडची पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत चोरी करण्यात आलेल्या ८ मोटारींसह आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींकडून २ लाखांहून अधिक किमतीचे पंपसेट जप्त करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे पंपसेट चोरीला गेल्याच्या तक्रारीचा तपास करणाऱ्या कुडची पोलिसांना यश आले असून पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील रेल्वे गेटजवळ संशयास्पदरित्या आढळलेल्या २ आरोपींना मोटारसायकल व पंपसेटसह अटक केली आहे. कुडची, चिंचली, मोराबा या गावातील पंपसेट चोरून विकण्यासाठी लपवून ठेवल्याची कबुली आरोपींनी दिली असून त्यांच्याकडून रु. 2.05 लाख किमतीचे 08 चालू स्थितीतील पंपसेट व चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: