Dharwad

दुष्काळी मदत जाहीर करावी : रत्नभारत रयत समाजाचे आंदोलन

Share

सर्व पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी रत्न भारत रयत समाजाच्या सदस्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

रत्नभारत रयत समाज नवी दिल्ली संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धारवाडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

यावेळी अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी जिल्हा आयुक्त कार्यालयात दाखल झालेले जिल्हा पालकमंत्री संतोष लाड यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या व मागण्यांचे पत्र देऊन कर्जमुक्तीची मागणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण लक्ष घालू, असे आश्वासन जिल्हा पालक मंत्री संतोष लाड यांनी शेतकऱ्यांना दिले.

Tags: