अवैधरित्या गायींची तस्करी करण्यात येत असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवाहू वाहन जप्त करून धारवाड उपनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धारवाड शहरातील बेळगाव रस्त्यावर गायींची वाहतूक करणारे एक मालवाहू वाहन पकडून उपनगर पोलिस स्थानकाच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मालवाहू वाहन व चालक व वाहनातील दोन कामगारांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.


Recent Comments