actors

खूनप्रकरणी अभिनेता दर्शनाला कारावासाची शिक्षा होणार कि नाही? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

Share

चित्रदुर्ग येथील एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता दर्शनला अटक करण्यात आली असून यासंदर्भात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांना माहिती देताना गृहमंत्री म्हणाले, खून प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान अभिनेता दर्शनचा देखील खून प्रकरणात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तपासाचा भाग म्हणून अभिनेता दर्शनला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत काहीही सांगता येणे शक्य नसून या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासानंतर मिळतील, पोलीस विभाग तपास करत आहे. यामुळे अधिक माहिती देता येणार नाही. असे ते म्हणाले. ()

अभिनेता दर्शनला म्हैसूरमध्ये अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणी बेंगळुरूला बोलावून चौकशी केली जात आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tags: