Bailahongala

बैलहोंगल येथे पोलीस हवालदाराची गळफास लावून आत्महत्या

Share

 

बैलहोंगल येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या सभा भवनाजवळ एका मद्यधुंद पोलीस हवालदाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुरकीबावी गावातील बसनगौड इराप्पा गौडर (वय 40) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. हा हवालदार तालुक्यातील दोडवाड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता. निवडणूक ड्युटी संपवून सदर हवालदाराने रजा घेतली होती. मद्यधुंद अवस्थेत त्याने आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Tags: