नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या औचित्याने सुरेश यादव फाऊंडेशन आणि राम तीर्थनगर येथील रहिवाशांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून आणि रोपांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचताच मोदी चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला. शपथविधी सुरु होतच मोदी चाहत्यांनी टाळ्या, शिट्ट्या, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सुरेश यादव, सामाजिक कार्यकर्त्या श्रीशैल हिरेमठ, महादेव टोनी, गुरुपुत्रप्पा तोरगल्ल, बाळाप्पा हंजी, अभिषेक आगसगी, अक्षय अंबडगट्टी, संतोष मेरकर, हुंडी, राजू पाटील, मल्हार दीक्षित, शंकर जिनराल, केम्पण्णा जिनराल, निरावणी बेन्ने, अमोल बिडीकर, रामचंद्र सासनूर, अजय आदी उपस्थित होते.


Recent Comments