लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना आघाडी देऊ न शकणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या काँग्रेस आमदार बसवराज शिवगंगा यांच्या विधानावर पलटवार करत डी. के शिवकुमार यांनी, आमदारांनी तोंड बंद ठेवले तर बरे होईल, असा इशारा दिला.
बंगळुरूमध्ये बोलताना डी.के शिवकुमार म्हणाले, आपल्याला लोकसभा निवडणुकीत 14 ते 15 जागा मिळतील असा विश्वास होता. पण काही ठिकाणी विजय मिळविण्यात आम्ही अपयशी ठरलो. आता वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. माझ्या मतदार संघातही धक्का बसला आहे. याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाही मंत्र्याने पराभवाची तक्रार केली नाही, यामुळे आघाडी देऊ न शकणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या बसवराज शिवगंगा यांच्या विधानावर प्रत्त्युत्तर देत डीकेशींनी आमदारांना तोंड बंद ठेवण्याचा सूचनावजा इशारा दिला आहे.
एआयसीसीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समिती स्थापन करण्याबाबत बोलताना ते म्हणाले, राहुल गांधींनी अहवाल सादर करण्यास सांगितले असून या संदर्भात आम्ही बैठक घेणार आहोत. आम्ही आज बंगळुरूच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. कुठे चूक झाली ते आम्ही तपासू. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. विजय-पराजयाबाबत कोणीही मीडियाशी बोलू नये, अशी सूचना त्यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
Recent Comments