पाळीव कुत्र्याच्या अंगावरून सरकारी बस गेल्याने कुत्र्याच्या मालकाने बस थांबवून बस चालक व वाहकाला मारहाण केल्याची घटना हुबळी येथील गदग रोडवर आज सकाळी घडली.

पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन गेलेल्या कुत्र्याच्या अंगावरून कलबुर्गी ते हुबळी मार्गाने जाणारी बस गेल्याने कुत्र्याच्या मालकाने बस चालक आणि वाहकाला मारहाण केली. बॉक्सर जातीच्या कुत्र्याच्या अंगावरून बस गेल्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या मालकाने हे कृत्त्य केले आहे. हुबळी पूर्व रहदारी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत हि घटना घडली आहे.


Recent Comments