जय जय रामकृष्ण हरी… पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा मुखाने जयघोष करीत , भजन कीर्तन करीत पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी बेलूरयेथून निघालेल्या वारकरी दिंडीचे बेळगावातील महंतेशनगर येथे स्वागत करण्यात आले.
धारवाड जिल्ह्यातील बेलूर गावातून वारकरी दिंडी देहू आळंदी मार्गे पंढरपूरला जात आहे . . वारकरी दिंडीचे आज बेळगाव येथील महांतेशनगरमध्ये ऍड . सदाशिव हिरेमठ यांनी स्वागत केले . जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग हरीचा जयघोष, सुभाष जोशी यांनी भजन व कीर्तन करून केला. यावेळी महंतेशनगरातील नागरिक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन गेले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले .
सोमशेखर हिरेमठ, गिरीश बाळेकुंद्री, राजू गुरव, भरत अनगोळ , माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ, नगर सेवक राजशेखर डोणी, हनुमंत कोंगाळी, महालक्ष्मी महिला मंडळाच्या सदस्या आदींचा सहभाग होता.


Recent Comments