बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हंदीगुंद गावाच्या हद्दीत कारचा अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला .

कार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला धडकली आणि पलटी होऊन दोघांचा मृत्यू झाला. रायबाग तालुक्यातील पलबावी गावातील महालिंग गुरुपद निंगनूर (४७) आणि त्याच गावातील इराप्पा चन्नबसू उगारे (३२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इमाम राजेसाब सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार पलटी झाल्याने कार चालक सद्दाम हतलसाब पठाण कार सोडून पळून गेला. हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments