श्री शनैश्वर एज्युकेशन ॲण्ड सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीने बेळगाव शहरात सूर्यपुत्र शनिदेव जयंतीनिमित्त महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
6 जून रोजी सूर्यपुत्र श्री शनैश्वर जयंती उत्सव सुरू झाला. बेळगाव येथील पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात श्री शनि जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे या वेळीही महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री गुरुसिद्ध स्वामीजींनी पूजा करून भव्य महाप्रसादाचा शुभारंभ केला .
गेल्या 21 वर्षांपासून श्री शनैश्वर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. उर्वरित देणगीच्या रकमेतून सार्वजनिक सेवेसाठी इमारत बांधण्याचा प्रस्तावही सोसायटीने दिला आहे. तसेच रुग्णालयाच्या सेवेसाठी 24 तास रुग्णवाहिका सेवा, सर्जिकल साहित्याची मदत, गरीब मुलांच्या शिक्षणासाठीही मदत केली जात असल्याचे समाजातील मान्यवरांनी सांगितले.
अनिल चौधरी यांनी याबद्दल अधिक माहिती दिली .
यावेळी सुमारे 20 ते 30 हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments