सीमावर्ती जिल्हा बेळगावमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. निपाणी आणि मुडलगीमध्ये मोठा अनर्थ घडला, एक व्यक्ती पाण्यात बेपत्ता.. 12 जण मृत्यूच्या जबड्यातून सुटले, तर झाड पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आणि बेळगावच्या सीमावर्ती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या कहरामुळे बेळगावात मोठा अनर्थ टळला आहे. 12 जण मृत्यूच्या जबड्यातून सुटले आहेत. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची आवक काही प्रमाणात वाढली आहे. विशेषत: निप्पाणी, मुडलगी तालुक्यात मोठा अनर्थ टळला आहे. कारण निप्पाणी तालुक्यातील लखनापुर नाला तुडुंब भरून वाहत आहे. यावेळी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारा मिनी ट्रक अडकला. तात्काळ वाहनातून बाहेर पडलेल्या चालकाचा जीव वाचला. 13 मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ओव्हरफ्लो मध्य अडकून पडला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी नांदगावजवळ ही घटना घडली असून, ट्रॅक्टरमधील 13 जणांपैकी एक जण पाण्यात बेपत्ता झाला असून, उर्वरित 12 जणवाचले आहेत .
बेळगावातही पावसाने लोकांची झोप उडवली आहे. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात दुचाकीस्वारावर झाड पडल्याने सोमनाथ मुचंडीकर यांचा मृत्यू झाला. विठ्ठल आणि स्वप्नील हेही जखमी झाले. मुसळधार पावसामुळे आनंदवाडीतील कालवा ओव्हरफ्लो होऊन आनंदवाडीतील 30 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. कालव्याचे काम पूर्ण न केल्याबद्दल लोकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिव्याशाप दिले. दरम्यान, स्मार्ट सिटीसह अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे.
एकंदरीत, नदी, नाले ,ओढे दुथडी बाहेरून वाहू लागले आहेत . मलप्रभा नदीत बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.


Recent Comments